यंदा दिवाळीपूर्वी तुमचं नशीब नक्की बदलणार, फक्त घरातल्या या वस्तू तात्काळ फेका!

दिवाळीपूर्वी घरातून काही विशिष्ट वस्तू काढून टाकणे शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख-समृद्धी नांदते.

| Updated on: Sep 29, 2025 | 9:40 AM
1 / 10
अवघ्या महिन्याभरावर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी दिवाळीपूर्वी घरातून काही विशिष्ट वस्तू काढून टाकणे शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख-समृद्धी नांदते.

2 / 10
दिवाळीपूर्वी जर तुमच्या घरात तुटलेली काच किंवा भांडी असतील तर ती काढून टाका. वास्तुशास्त्रानुसार, तुटलेली काच (आरसा) आणि भांडी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. यामुळे कुटुंबात आर्थिक समस्या येतात.

3 / 10
जर तुमच्या घरात बंद झालेले किंवा बिघाड झालेले घड्याळ असेल तर ते तात्काळ काढून टाका. बिघाड झालेले किंवा बंद घड्याळ प्रगतीतील अडथळे निर्माण करते. यामुळे वाईट काळात वाढ होऊ शकते.

4 / 10
तुटलेले, जीर्ण झालेले किंवा वापरात नसलेले फर्निचर घराची सकारात्मक ऊर्जा कमकुवत करते. त्यामुळे ते त्वरीत घराबाहेर टाकून द्या. यामुळे नशीब आणि समृद्धीच्या मार्गात बाधा येऊ शकते.

5 / 10
कधीच देवतांच्या तुटलेल्या मूर्ती आणि फोटो घरात ठेवू नये. पूजास्थानी ठेवलेल्या देवतांच्या तुटलेल्या, खंडित किंवा विद्रूप झालेल्या मूर्ती घरात अशांतता आणि नकारात्मक ऊर्जा आणतात. यामुळे घरातील धार्मिक वातावरणात नकारात्मकता येते.

6 / 10
 जुनी किंवा गंजलेली लोखंडी भांडी, उपकरणे आणि धातूच्या वस्तू घरात असतील तर त्या तात्काळ काढून टाकाव्यात. यामुळे शनि आणि राहूचा नकारात्मक प्रभाव वाढवू शकतो. दिवाळीपूर्वी त्यांची योग्य विल्हेवाट लावणे किंवा भंगारात देणे हे खूप शुभ मानले जाते.

7 / 10
त्यासोबतच जुने, फाटलेले कपडे आणि चपला घरात दारिद्र्य आणि नकारात्मकता वाढवतात. ते घरातून काढून टाका. तसेच वाळलेली फुले किंवा घरात सुकलेल्या वनस्पती अशुभ मानले जाते. त्यामुळे ते त्वरित हटवा.

8 / 10
जुनी वर्तमानपत्रे, मासिके किंवा इतर कोणत्याही निरुपयोगी वस्तू, ज्या केवळ जागा व्यापतात किंवा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, ते तात्काळ काढून टाका. घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून अनावश्यक वस्तू बाहेर काढा.

9 / 10
 या सर्व वस्तू घरातून काढून टाकल्याने घरात स्वच्छता तर होतेच, पण त्यासोबतच सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीदेवीच्या आगमनासाठी योग्य वातावरण निर्माण होते, ज्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी नांदते.

10 / 10
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)