
वास्तूशास्रानुसार आपले ओळखीचे मित्र किंवा नातलग आपल्याला मोफत वस्तू देत असतात. किंवा काही लोक आपल्या जवळच्या लोकांकडून वस्तू मागत असतात. तु्म्हीही या वस्तू मोफत घेत असाल तर सावधान राहा. वास्तूशास्रानुसार जर मोफत काही वस्तू घेत असाल तर आर्थिक स्थितीवर निगेटिव्ह परिणाम होतो.

कोणत्याही व्यक्तीकडून वा परिचिताकडून कधी रुमाल गिफ्टमध्ये घेऊ नये.. त्यामुळे आपले संबंध देखील खराब होऊ शकतात. त्यामुळे कोणी रुमाल गिफ्ट देत असेल तर अजिबात घेऊ नका किंवा कोणाला रुमाल गिफ्ट देखील देऊ नका.

वास्तू शास्रानुसार कोणाकडूनही मोफत मीठ घेऊ नका. मीठ फूकट घेतल्याने कर्जाचे प्रमाण वाढते. तसेच आरोग्य विषयक समस्या देखील वाढतात. त्यामुळे कोणाकडूनही मीठ , तेल मोफत घेऊ नये. यामुळे आपल्या आर्थिकहानी होऊ शकते.

कोणाकडे देखील मोफत माचिस घेऊ नये. यामुळे कुटुंबात तणाव किंवा अशांती वाढू शकते. कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू मोफत किंवा गिफ्ट म्हणून घेऊ नका. यामुळे राहू ग्रहाची बाधा होते असे ज्योतिषशास्र मानते.

गिफ्ट म्हणून पाकिट घेतल्याने देखील आर्थिक हानी होऊ शकते. वास्तूशास्रानुसार जेव्हा आपण पर्स गिफ्ट म्हणून देतो. त्याव्यक्तीकडे आपल्या धनाच्या संदर्भातील योग-संयोग देखील ट्रान्सफर होऊ शकतात. पर्स आपल्या आर्थिक स्थितीचे प्रतिनिधीत्व करते. त्यामुळे आपल्याकडे येणारे पैसे, धन त्या व्यक्तीकडे जाते, ज्याने आपल्याला पर्स दिलेली आहे.त्यामुळे पर्स गिफ्ट देऊ किंवा घेऊ नका.

सूचना - या लेखात दिलेल्या सूचना आणि माहिती ही सत्य आणि खरी असेल असा आमचा दावा नाही. या संदर्भात योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.