Vastu Tips : घरी झोपताना 5 गोष्टी बेडजवळ ठेवू नका, अन्यथा…

तुम्ही झोपण्यापूर्वी अंथरुण किंवा बेडजवळ ठेवलेल्या अप्रिय वस्तू दूर ठेवल्या पाहिजे. अन्यथा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या झोपण्यापूर्वी काय काळजी घ्यावी.

| Updated on: Aug 08, 2026 | 3:03 PM
1 / 6
तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी काळजी घेतली पाहिजे. कारण घरात तुमच्या बेड आणि उशीजवळ ठेवलेल्या वस्तूंमुळे तुमच्या झोपेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी जाणून घ्या रंजक माहिती

तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी काळजी घेतली पाहिजे. कारण घरात तुमच्या बेड आणि उशीजवळ ठेवलेल्या वस्तूंमुळे तुमच्या झोपेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी जाणून घ्या रंजक माहिती

2 / 6

अनेकांचं रात्री मन आणि शरीर हे विश्रांतीच्या अवस्थेत असते. तुमच्या अंथरुणाजवळ असलेल्या वस्तूंचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्ही नकळतपणे ठेवलेल्या वस्तूमुळे तुम्हाला झोपेशी संबंधित समस्या जाणवू शकतात, असे वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

3 / 6

तुमच्या बेडखाली किंवा डोक्याजवळ बूट किंवा चपला ठेवणे टाळणे फायदेशीर ठरेल. यामुळे तुमच्या खोलीत नकारात्मकता निर्माण होऊ शकते, असेही वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. त्याचबरोबर बेडजवळ अयोग्य वस्तू ठेवल्यातरी मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

4 / 6

पुस्तके, वर्तमानपत्रे, अभ्यासाचे नोट्स देखील उशी किंवा डोक्याजवळ ठेवणे योग्य मानले जात नाही. या गोष्टी योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजे. त्यामुळे तुमच्या मनावर ताण येऊ शकतो.

5 / 6

घरात झोपताना मोबाइल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू डोक्याजवळ ठेवणे टाळावे. रात्री वारंवार मोबाईलमध्ये डोकावल्याने तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.

6 / 6

वास्तूशास्त्रानुसार, तुम्ही घरात झोपताना उशी किंवा बेडजवळ पर्स, पाकीट किंवा रोख ठेवणे टाळणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमच्या मनातील आर्थिक चिंता वाढण्याची शक्यता असते. त्याचा झोपेवरही परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या वस्तू कपाट किंवा लॉकरमध्ये ठेवाव्या. टीप : लेखातील माहिती वास्तूशास्त्रावर आधारित आहे. या लेखातील माहिती खरी असल्याचा आमचा कोणताही दावा नाही. याविषयी अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us