
राज्यातील अनेक भागात भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. उन्हाळा आला असताना विविध भाज्यांचे दर जमिनीवर आहेत.

बटाटे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरचीला मोठा भाव नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

सध्या जळगाव जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर अत्यंत घसरले असून, शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाचा खर्चही वसूल होत नाही.

खत, बियाणे, मजुरी याचा प्रचंड खर्च असूनही बाजारात भाजीपाला अवघ्या ३ ते १२ रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

