
१ ऑक्टोबर हा दिवस जागतिक शाकाहारी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश शाकाहारी जेवणाचा प्रचार करणे तसेच लोकांना शाकाहारी जीवनशैलीबद्दल जागरूक करणे.

आपल्याकडे जेवण झाल्यावर गोड खाल्लं जातं. काजू कतली परदेशात खूप प्रसिद्ध आहे. परदेशातील लोक सुद्धा जेवण झालं की बर्फी, गोड काहीतरी खाणं पसंत करतात.

राजमा चावल! ही सगळ्यात चविष्ट डिश आहे असं म्हणायला हरकत नाही, हो ना? गरम गरम राजमा आणि चावल खूप मस्त लागतात. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्येही राजमा चावल खूप आवडतो.

पापडी चाट हे उत्तर भारतातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. परदेशी लोक हे मोठ्या आवडीने खातात. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पापड चाट बनवली जाते. हे स्ट्रीट फूड परदेशी लोकांनाही खूप आवडते.

दाल मखनीचे खूप चाहते आहेत. कुठल्याही हॉटेलवर गेलं, कुठेही गेलं की दाल मखनी हा बेस्ट ऑप्शन असतो. ही एक पंजाबी डिश आहे पण तिचे बाहेरच्या देशात खूप-खूप चाहते आहेत. दाल मखनी नान किंवा पराठ्यासोबत खाल्ली जाते. परदेशात या डिशला खूप मागणी आहे.