सापाचा हा उपयोग कुणालाच माहिती नाही, चक्क वाचतो माणसाचा जीव, जाणून घ्या..

अनेकांना सापाची भीती वाटते. काही लोक तर साप दिसला की त्याला मारायला जातात. पण साप माणसाांचे प्राण वाचवतो.

| Updated on: Jul 16, 2025 | 9:39 PM
1 / 6
आपल्याकडे सापाबाबत अनेक गैरसमज आहेत. साप चावला की मृत्यू होतोच, असे बहुसंख्य लोकांना वाटते. त्यामुळेच साप दिसला की लोक त्याला मारण्यासाठी धावतात.

2 / 6
पण प्रत्येक साप हा विषारी नसतो. काही सापांनी दंश केला तरी मृत्यू होत नाही. विशेष म्हणजे जगातील एकूण सापांच्या प्रजांतीपैकी फारच कमी प्रजाती या विषारी आहेत. त्यामुळे दिसलेल्या प्रत्येक सापाला मारणे चुकीचे आहे.

3 / 6
साप हा अनेक अर्थांनी उपयोगात येणारा सरपटणारा प्राणी आहे. सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते. अन्नसाखळीत सापाचे आपले असे विशेष महत्त्व आहे. पर्यावरणीय संतुलनासाठी साप हा महत्त्वाची भूमिका बजावतो.

4 / 6
सापाचा आरोग्य आणि उपचार क्षेत्रातही मोठा उपयोग होतो, असे म्हटले जाते. अनेक विषारी सापांचे विष हे जीवनरक्षक औषधांच्या निर्मितीसाठी वापरले जाते. सापाच्या विषापासून सिरम तयार केले जाते.

5 / 6
तसेच हृदयविकारावर गुणकारी ठरणाऱ्या काही औषधांचीही निर्मिता सापाच्या विषापासून केली जाते. न्यूरोलॉजिकल संशोधनातही सापाच्या विषाचा वापर होतो. त्यामुळे सापाला कोणतेही कारण नसताना मारून टाकणे चुकीचे आहे.

6 / 6
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही यातील कोणत्याही माहितीचा दावा करत नाही किंवा समर्थनही देत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)