विमानतळावर ब्लॅक आऊटफिटमध्ये जबरदस्त लूकमध्ये दिसले विकी आणि कतरिना

विकी कौशल आणि कतरिना कैफ नुकतेच विमानतळावर स्पॉट झाले. दोघेही ब्लॅक लूकमध्ये दिसले होते. विकी किलर लूक देत असताना कॅट बार्बी डॉलसारखी दिसत होती.

यादरम्यान कॅट ब्लॅक हुडी, शूज आणि लेगिंगसह सनग्लासेस पेअर करताना दिसली. तर दुसरीकडे, विकीने सुद्धा काळ्या रंगाच्या हुडीच्या जोडीला टोपीसह पॅंट, काळे शूज आणि सनग्लासेस लावले.

दोघेही एकत्र खूपच छान दिसत होते. या जोडीचं चाहते कौतुक करत होते. मात्र काही चाहत्यांनी त्यांना रात्रीच्या वेळी सनग्लासेस लावल्यामुळे दोघांना ट्रोल केले आहे.

नुकताच विकी काैशल याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये विकी काैशल हा कतरिना हिच्याबद्दल सांगताना दिसला. विकी काैशल म्हणाला की, माझ्या काही गोष्टींमध्ये कतरिनाला अनेक चुका दिसतात.

मी ज्यावेळी चित्रपटातील गाण्याचा सराव करतो, त्यावेळीचा व्हिडीओ हा कतरिनाला हवा असतो. ती सतत तो व्हिडीओ मला मागते. मात्र, तिला व्हिडीओ पाठवण्याची मला भीती वाटते, असं विकी म्हणाला होता.