जीवघेण्या आजारावर मात करत विद्याधर जोशींचं मालिका विश्वात पुनरागमन

'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेतील बाळा मामाची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकसुद्धा उत्सुक आहेत. ही मालिका रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेतून विद्याधर जोशी हे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत.

| Updated on: Jan 20, 2025 | 12:00 PM
1 / 7
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येडं लागलं प्रेमाचं' या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळतंय. लवकरच या मालिकेत  अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी यांची एण्ट्री होणार आहे. उमाच्या भावाची म्हणजेच बाळामामाची भूमिका ते साकारणार आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येडं लागलं प्रेमाचं' या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळतंय. लवकरच या मालिकेत अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी यांची एण्ट्री होणार आहे. उमाच्या भावाची म्हणजेच बाळामामाची भूमिका ते साकारणार आहेत.

2 / 7

जीजी म्हणजेच उमाचा हा भाऊ आयुर्वेदिक औषधांचा जुना जाणकार असून मंजिरीचा जीव धोक्यात असताना तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी बाळामामा पंढरपूरात आले आहेत.

3 / 7

वृत्तीने कर्मठ, अभिमानी, परखड आणि स्पष्टवक्ता असलेल्या बाळामामाला समाजात प्रचंड आदराचं स्थान आहे. उमाला तू चुकते आहेस असं तोंडावर सांगू शकणारा बाळामामा तेवढाच लाघवी आणि प्रेमळ आहे.

4 / 7

बाळामामाची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते विद्याधर जोशी जीवघेण्या आजारावर मात करुन जवळपास दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा कलाक्षेत्रात आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

5 / 7

अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणारे सर्वांचे लाडके बाप्पा जोशी आता 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेच्या माध्यमातून एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

6 / 7

याविषयी सांगताना ते म्हणाले, "दोन वर्षांनंतर आवडीचं काम करताना मला अतिशय आनंद होतोय. मनाला आतून उभारी येतेय असं वाटतं. माझ्या नशिबाने सेटवरची सगळीच मंडळी माझी काळजी घेत शूटिंग करत आहेत."

7 / 7

"स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांनी देखील मला प्रचंड मानसिक आधार दिला. गेली दोन अडीच वर्ष आजारपणामुळे मी अभिनय क्षेत्रापासून लांब होतो. मात्र आता माझी प्रकृती उत्तम आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच मी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात करत आहे," असं ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us