
माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळी त्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चर्चेत आहे. अलिकडे एका व्हिडीओ त्याचा जीवलग मित्र सचिन तेंडुलकर याच्या हस्तांदोलन करताना त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.या व्हिडीओ विनोद कांबळी असहाय, थकलेला आणि आजारी असल्याने अनेकांनी त्याला ओळखले ना्ही.विनोद कांबळी याचे जीवन वादळी राहीले आहे. त्याने दोन लग्नं केली.

विनोद कांबळी याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव एंड्रिया हेविट आहे. ती एक मॉडेल आहे. कांबळी आणि एंड्रिया यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलीचे नाव जोहाना क्रिस्टियानो आहे तर मुलाचे नाव जिसस क्रिस्टियानो कांबळी असे आहे.

-माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने दोन विवाह केले आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव नोएला लुईस असे आहे. जी पुणे येथील एका हॉटेलात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायची. लुईसला घटस्फोट दिल्यानंतर त्याने एंड्रीया हेविटशी लग्न केले ती एक मॉडेल आहे.

विनोद आणि एंड्रिया हेविट यांनी साल २०१४ मध्ये वांद्रे हिल रोड स्थित सेंट पीटर चर्चेमध्ये लग्न केले.त्यावेळी त्याचा मुलगा या लग्नात पाहुणा म्हणून उपस्थित होता.

एंड्रिया हेविट एकेकाळी लोकप्रिय मॉडेल होती.तिचे छायाचित्रे फॅशन मॅगझिन आणि जाहीरातीत झळकायची परंतू गेल्याकाही वर्षांपासून ती लाईमलाईटपासून दूर आहे.

एंड्रिया हीने आपल्या मॉडेलिंगची सुरुवात ज्वेलरी ब्रॅंड तनिष्क पासून सुरु केली होती. त्यानंतर ड्रीम सिटी मुंबईत तिने सौदर्य सल्लागार म्हणून खूप काळ काम केले.

एंड्रिया हेविट हीचे करिअर एकेकाळी खूपच बहरलेले होते. तिच्याकडे मोठ्या ऑफर होत्या. तिचा जन्म १९८२ चा असून ती आता ४१ वर्षांची आहे.