Virat Kohli | धोनीच्या रेकॉर्डवर विराट कोहलीचा डोळा, मोठा विक्रम मोडण्याची संधी

| Updated on: Jan 30, 2021 | 6:59 PM

विराट कोहलीला (Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेत धोनीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

1 / 5
ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे. इंग्लंड भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

2 / 5
इंग्लंड विरुद्धच्या या मालिकांसाठी टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलींच पुनरागमन झालं आहे. यासह विराटला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी आणि रेकॉर्ड मोडीत काढण्याची संधी आहे.

3 / 5
धोनीने आपल्या नेतृत्वात मायदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवून दिले आहे. धोनीने एकूण 21 कसोटींमध्ये टीम इंडियाला विजयी केलं आहे. तर विराटने आतापर्यंत एकूण 20 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे विराटने आपल्या नेतृत्वात एक सामना जिंकवल्यास धोनीच्या विक्रमाची बरोबरी होईल. तर 2 सामन्यात प्रतिस्पर्धी इंग्लंडला पराभूत केल्यास धोनीचा विक्रम मोडीतही निघेल.

4 / 5
कोहलीनंतर मोहम्मज अजहरुद्दीनचा क्रमांक लागतो. अजहरुद्दीने एकूण 13 कसोटी सामन्यांमध्ये भारताला विजयी केलं आहे. तर सौरव गांगुलीने 10 टेस्ट मॅचेसमध्ये विजय मिळवून दिला आहे.

5 / 5
विराट टीम इंडियाच आतापर्यंतचा यशस्वी कर्णधार आहे. विराटने एकूण 56 पैकी 33 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर धोनीने 60 कसोटींपैकी 27 सामन्यांमध्ये विरोधी संघाला पराभवाची धूळ चारली आहे. गांगुलीने 21, अजरहरुद्दीनने (14) आणि सुनील गावस्कर यांनी  (9) सामन्यात आपल्या नेतृत्वामध्ये विजय मिळवून दिला आहे.