14 षटकार, 32 चौकार, विराट पुन्हा धावांचा पाऊस पाडणार? ग्रीनफिल्ड मैदानात नवा इतिहास घडणार का? वाचा…

भारत पुन्हा एकदा तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर वनडे सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या मैदानावरील मागील सामन्याच्या आठवणींना यानिमित्ताने उजाळा मिळत आहे. काय घडलेलं या सामन्यामध्ये?

| Updated on: Sep 26, 2026 | 6:47 PM
1 / 5

भारताने ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात विराट कोहलीने १६६ धावांची नाबाद आणि धुवांधार खेळी उभारली होती.
अवघ्या ११० चेंडूंत १३ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली होती.

भारताने ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात विराट कोहलीने १६६ धावांची नाबाद आणि धुवांधार खेळी उभारली होती. अवघ्या ११० चेंडूंत १३ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली होती.

2 / 5

या सामन्यात केवळ विराटनेच नव्हे, तर सलामीवीर शुभमन गिलनेही ११६ धावांची आकर्षक शतकीय खेळी केली होती. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारतीय संघाने ५ गड्यांच्या मोबदल्यात ३९० धावांचा प्रचंड डोंगर उभा केला होता.

3 / 5

या डावामध्ये भारताने १४ षटकार आणि ३२ चौकार ठोकले होते. ३९१ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या ७३ धावांवर गारद झाला होता.

4 / 5

फलंदाजांच्या धमाकेदार कामगिरीनंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने १० षटकांत केवळ ३२ धावा देत ४ बळी टिपले होते. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे प्रतिस्पर्धी श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे सुरुवातीलाच मोडले होते.

5 / 5

भारतीय संघ पुन्हा एकदा तिरुवनंतपुरमच्या याच मैदानावर एकदिवसीय सामना खेळण्यासाठी सज्ज होत आहे. पण यावेळी संघाविरुद्ध वेस्ट इंडिजचा संघ असणार आहे. याही सामन्यात विराटची खेळी कशी असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us