
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या निवृत्तीनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी विराट कोहलीने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा केली नाही, असे सांगितलं जात आहे. आगामी काही दिवसांत भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची एक मालिका होणार आहे. या मालिकेच्या नंतरही विराट कोहली निवृत्तीचा निर्णय घेऊ शकला, असा असे काही जणकार म्हणत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहली बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला तसेच बीसीसीआयचे माजी सचिव जय़ शाहा यांची भेट घेणार होता. ही भेट घडून आली असती तर विराट कोहलीच्या निवृत्तीच्या विचारावर वेगळा पर्याय निघाला असता. तसे झाले असते तर कदाचित विराट कोहली कसोटी सामन्यांत खेळताना दिसला असता.

मात्र याच काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष चालू झाला आणि ही बैठक होऊ शकली नाही. ही बैठक झाली असती तर विराट कोहली कसोटी सामना खेळायला इंग्लंडला गेला असता आणि त्याचं एक स्वप्नही पूर्ण झालं असतं.

विराटला कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 10 हजार धावा करायच्या होत्या. सध्या हा आकडा गाठण्यासाठी त्याला 770 धावांची गरज होती. त्याचे हे स्वप्न आता अधुरेच राहिले आहे.

विराट कोहली