AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs KKR Toss : आरसीबीचा केकेआर विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, पावसामुळे 75 मिनिटं व्यर्थ, किती ओव्हरचा खेळ होणार?

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders, IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्सला 19 व्या मोसमात प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी आरसीबी विरुद्ध कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे. त्यामुळे केकेआर आरसीबी विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

RCB vs KKR Toss : आरसीबीचा केकेआर विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, पावसामुळे 75 मिनिटं व्यर्थ, किती ओव्हरचा खेळ होणार?
RCB vs KKR Toss IPL 2026Image Credit source: IPL X Account
| Updated on: May 13, 2026 | 9:44 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 57 व्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. या सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी साडे 7 वाजता 30 मिनिटांनी सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पावसाने विघ्न घातलं. रायपूरमधील या स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे सामना नियोजित वेळेत सुरु होण्यास विलंब झाला. मात्र पावसाची विश्रांती आणि त्यानंतर ग्राउंड स्टाफच्या अथक परिश्रमानंतर खेळपट्टी खेळण्यासारखी झाली.

सव्वा तासाचा खेळ वाया

आरसीबी-केकेआर सामन्याला तब्बल 75 मिनिटं अर्थात सव्वा तासांच्या विलंबाने सुरुवात होणार आहे. सुधारित वेळेनुसार सामन्याला रात्री पावणे नऊ वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने फिल्डिंगचा निर्णय घेत केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता केकेआर करो-मरो सामन्यात आरसीबीसमोर किती धावांचं आव्हान ठेवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे इतका वेळ वाया गेल्यानंतर सामन्यातील काही षटकं कमी करण्यात येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र त्यानंतरही एकही ओव्हर कमी करण्यात आलेली नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना संपूर्ण 20 ओव्हरचा थरार पाहायला मिळणार आहे.

केकेआरसमोर भुवी-हेझलवुडचं आव्हान

दरम्यान केकेआरच्या फलंदाजांसमोर आरसीबीचे प्रमुख आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांचं आव्हान असणार आहे. भुवनेश्वर कुमार पावरप्लेमध्ये विकेट घेण्यात माहिर आहे. तसेच जोशही चिवट बॉलिंग करतो. त्यामुळे केकेआरचे फलंदाज या दोघांचा कसा सामना करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, कॅमेरुन ग्रीन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नारायण, अनुकुल रॉय, वैभव अरोरा आणि कार्तिक त्यागी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : जेकब बेथेल, विराट कोहली, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हीड, व्यंकटेश अय्यर, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, रसिक सलाम दार, जेकब डफी आणि जोश हेझलवुड.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?