AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या लोकलचा प्रवास करताना सावध, संडे मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहा

मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी दि. २८ जून २०२६ रोजी मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

उद्या लोकलचा प्रवास करताना सावध, संडे मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहा
sunday mega block
| Updated on: Jun 27, 2026 | 11:16 PM
Share

मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला असल्याने लोकलचा प्रवास करण्याआधी मुंबईकरांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडणे फायद्याचे आहे. कारण मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे लोकल ट्रेन रविवारच्या मेगाब्लॉकनुसार धावणार आहेत. त्यामुळे गाड्यांना गर्दी होणार असल्याने सावधानतेने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य मार्गावर ब्लॉकचा कालावधी: सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाउन’ धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून स.१०.१४ ते दु. ३.३२ वा. या वेळेत सुटणाऱ्या ‘डाउन’ धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्यांना माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान ‘डाऊन’ जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा ‘डाऊन’ धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्या आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी ११.०७ वा. ते दुपारी ३.५१ वा. या वेळेत सुटणाऱ्या ‘अप’ धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकावर ‘अप’ जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील आणि पुढे माटुंगा येथे पुन्हा ‘अप’ धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यामुळे या लोकल आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे सकाळी ११.०० ते सायंकाळी १७.०० या वेळेत येणाऱ्या किंवा तिथून सुटणाऱ्या सर्व ‘अप’ आणि ‘डाऊन’ लोकल गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ट्रान्सहार्बर लोकल सेवा बंद

ठाणे आणि वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान स. ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

ब्लॉकच्या कालावधीत ठाणे आणि वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहे. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत वाशी -नेरुळ- पनवेलकडे जाणाऱ्या ‘डाऊन’ मार्गावरील लोकल सेवा आणि पनवेल- नेरुळ- वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकडे येणाऱ्या ‘अप’मार्गावरील लोकल फेऱ्या करण्यात येतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत