एक-एक टक्का देतो, आधी 40… शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील खासदारांच्या बंडाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे हे नाराज खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.
राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील खासदारांच्या बंडाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे हे नाराज खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. दुसरीकडे शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा केला जात असून लवकरच आणखी काही आमदार पक्षात येतील, असे वक्तव्यही करण्यात येत आहे.
अशातच आता शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक कथित व्हिडीओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे सोलापूरचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कंत्राटदार आणि राजेश क्षीरसागर यांच्यात टक्केवारीबाबत चर्चा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कथित व्हिडीओमध्ये “तुमचे 5 टक्के आणि आणखी दोघांचे 1-1 टक्के दिले,” असे संभाषण ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच “अगोदर 40 लाख दिले, आता काम नको,” असेही या व्हिडीओत ऐकायला मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. (सदर व्हिडीओची टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाही)
Published on: Jun 27, 2026 05:56 PM
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा

