AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?

ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण…. बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?

| Updated on: Jun 27, 2026 | 3:26 PM
Share

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या बंडखोर खासदारांमध्ये यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांचाही समावेश आहे. बंडखोरीनंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या बंडखोर खासदारांमध्ये यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांचाही समावेश आहे. बंडखोरीनंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली, त्या ठिकाणी जाऊन ठाकरे कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांच्या मतदारसंघात जाऊन बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही संजय देशमुख यांच्यावर निशाणा साधला होता. आता या टीकेला संजय देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“आम्ही 6 खासदारांनी विकासाच्या मुद्द्यावर निर्णय घेतला आहे. जनतेने ज्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिले, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला,” असे संजय देशमुख म्हणाले. तसेच “संजय राऊत काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही. ते सतत सर्वांवर टीका करतात. अगदी वायफळ बोलत असतात… त्यांच्या वक्तव्यांमुळेच ठाकरे गट कमजोर होत चालला आहे,” असा हल्लाबोलही त्यांनी केला. पुढे त्यांनी सांगितलं ‘आदरणीय उद्धव साहेबांबाबत मला काही विशेष बोलायचं नाही.’

Published on: Jun 27, 2026 03:25 PM

Follow Us