Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले….
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधारी गटात जाण्याच्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली आहे. सामान्य माणसाच्या समस्या सोडवणे आणि मतदारसंघाचा विकास करणे हीच माझी प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधारी गटात जाण्याच्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली आहे. सामान्य माणसाच्या समस्या सोडवणे आणि मतदारसंघाचा विकास करणे हीच माझी प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी एका चर्चित विषयावरुन पर्दा उठवला असून त्यांनी मंत्री पदाबाबत मोठा खुलासा केला आहे. “मी रोज सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात असतो. त्यांच्या अडचणी खूप मोठ्या आहेत आणि त्या सोडवणे माझी जबाबदारी आहे,” असे ओमराजे निंबाळकर म्हणाले.
लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य नागरिकांची कामे करणे हे माझे कर्तव्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सत्यजित जोड मिळाल्यामुळे आता आणखी चांगल्या पद्धतीने लोकांची कामे करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “सामान्य माणसाच्या कामातूनच मी माझ्यावर होणाऱ्या सर्व टीकेला उत्तर देईन,” असेही त्यांनी म्हटले.
केंद्रात राज्यमंत्रीपद मिळणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, मंत्री होणे ही माझी प्राथमिकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. धाराशिव जिल्हा मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीत 3 क्रमांकावर असल्याने त्या भागाचा विकास करण्यासाठी आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सत्तेच्या बाजूने आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
Published on: Jun 27, 2026 05:37 PM
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम

