IND vs NZ : न्यूझीलंडला धोपटण्यात विराट सर्वात पुढे, आणखी 29 धावा हव्या, मग होईल अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड

IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्ध चालू वनडे सीरीजच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने एकाच मॅचमध्ये सात रेकॉर्ड केले. आता पुढच्या दुसऱ्या सामन्यातही विराटकडे एक मोठा रेकॉर्ड नोंदवण्याची संधी आहे.

| Updated on: Nov 05, 2026 | 6:21 PM
1 / 5
 भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने 51 चेंडूत 74 धावा फटकावल्या. विराट न्यूझीलंड विरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाईल दिग्गज रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे.

भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने 51 चेंडूत 74 धावा फटकावल्या. विराट न्यूझीलंड विरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाईल दिग्गज रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे.

2 / 5

न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज आधी विराट कोहलीच्या नावावर 1897 धावा होत्या. सीरीजमधील पहिल्या सामन्यात 74 धावा केल्यानंतर हा आकडा 1971 धावांपर्यंत पोहोचला आहे. सोबतच त्याने रिकी पाँटिंगशी बरोबरी केली आहे.

3 / 5

रिकी पाँटिंगने सुद्धा न्यूझीलंड विरुद्ध तितक्याच 1971 धावा केल्या आहेत. पण पाँटिंग आता क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झालाय. विराट अजूनही खेळतोय. विराटकडे पाँटिंगला मागे टाकण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला फक्त एक रन्सची आवश्यकता आहे.

4 / 5

पाँटिंग आणि विराट दोन्ही दिग्गजांनी न्यूझीलंड टीम विरुद्ध 1971 धावा केल्या आहेत. दुसऱ्या वनडेमध्ये 29 धावा करताच न्यूझीलंड विरुद्ध वनडे मध्ये 2000 धावा करणारा विराट जगातील पहिला फलंदाज बनेल.

5 / 5

विराट कोहलीकडे यापेक्षाही मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे. न्यूझीलंड विरुद्ध अजून 29 धावा केल्यास त्याच्या या टीम विरुद्ध 2000 धावा पूर्ण होतील. अशी कामगिरी करणारा क्रिकेट विश्वातील तो पहिला फलंदाज असेल. कोहलीने अवघ्या 37 इनिंगमध्ये 1971 धावांचा टप्पा गाठला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us