
पृथ्वीवरील सर्वात अतिशीत जागा वोस्टोक स्टेशन आहे, जे अंटार्टिका बेटावर आहे. हे एक रशियन रिसर्च सेंटर आहे. जे समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० मीटर उंचीवर आहे.येथे तापमान इतकी निच्चांकी आहे की माणूस काही क्षणात गोठू शकतो.

एका बातमीनुसार २१ जुलै १९८३ रोजी वोस्टोक स्टेशनचे तापमान - ८९.२ डिग्री सेल्सियस इतकी खाली गेले होते. हे पृथ्वीवरील आतापर्यंत नोंदले गेलेले सर्वात कमी तापमान आहे.येथे सर्वसाधारणपणे - ५५ डिग्री सेल्सियस तापमान असते.

रशियन वोस्टोक स्टेशन सुमद्रसपाटीपासून ३५०० मीटर उंचीवर आहे. उंचीमुळे त्याचे तापमान कमी होते. येथे सुर्याची किरणे सरळ पडत नाहीत, बर्फाचा जाड थर सुर्यप्रकाश परावर्तित करतो. ज्यामुळे येथे जास्त थंडी असते. वोस्टोक स्टेशनचा शोध १९५७ मध्ये सोव्हीएत रशियाच्या संशोधकांनी केला होता.येथे सर्वसाधारणपणे उणे ५५ डिग्री सेल्सिअस तापमान असते.

इतक्या थंडीत संशोधकांना येथे राहणे सोपे नाही. येथील प्रतिकूल तापमानात राहण्यासाठी खास प्रकारचे थर्मल कपडे घालावे लागतात. थंडी पासून माणसाला आणि यंत्रांना वाचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तरीही येथे बराच काळ रहाणे शक्य नाही इतके कमी तापमान आहे.

वोस्टोक स्टेशनवर कुठलेच झाडे झुडपे नाहीत. कोणतेही प्राणी रहात नाहीत. येथे रहाण्यायोग्य ऑक्सिजन, तापमान आणि अन्न साखळी अस्तित्वात नाही.अंटार्टिकाच्या अन्य भागात आढळणारे पेंग्विन देखील येथे रहात नाहीत.

हे ठिकाण अंत्यत प्रतिकूल असले तरी येथे संशोधक पृथ्वीचा इतिहास आणि ग्लोबल वार्मिंग याचा अभ्यास करण्यासाठी काम करीत आहे.. वोस्टोक स्टेशनच्या खाली एक तलाव आहे. ज्याला वोस्टोक तलाव म्हणतात. हा तलाव १५ मिलीयन वर्षांपासून गोठलेला आहे.येथील पाणी पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळातील असल्याचे म्हटले जाते.

वोस्टोक स्टेशन केवळ थंडीचे प्रतिक नाही. तर हे मानवाच्या धैर्य आणि वैज्ञानिक जिज्ञासेचेही प्रतिक आहे. येथील संशोधनात पृथ्वीचा इतिहासच शोधला जात नाही तर कठीण परिस्थितीही मानव कसा जगू शकतो याचे देखील हे प्रतिक आहे.