
चालणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. बरेच लोक दिवसातून 20 ते 25 मिनिटे चालतात. विशेष म्हणजे शरीर मजबूत होण्यासही मदत होते.

चालल्याने हृदयाची क्षमता वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील चयापचय सक्रिय होते. हेच नाही तर स्नायू आणि हाडे मजबूत होण्यासही मदत होते.

दररोज चालण्यामुळे ताण कमी होतो शिवाय झोप सुधारते आणि मन ताजेतवाने राहते. यामुळे निरोगी आरोग्यासाठी चालणे अत्यंत आवश्यक आहे.

शिवाय दररोज चालल्याने आपले वजन कमी होण्यासही मदत होते. यामुळे दिवसातून वेळ काढून थोडावेळ तरी चालणे आवश्यक आहे.

सकाळी आणि रात्री जेवणानंतर किमान वीस मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा. हे केल्याने पचनशक्तीही चांगली राहते. तुम्ही घरात देखील वीस मिनिटे चालू शकता.