दोन मिनिटात धुवा घरच्या घरी हातांनी सिल्क साडी, फक्त शेवटी ही चूक टाळा..
सिल्कच्या साड्या सर्वजण बाहेरच धुण्यासाठी टाकतात. मात्र, आपल्या साडीला काही होणार नाही ना? याची भिती जवळपास सर्वांच्या मनात असते. कारण सिल्कच्या साड्या महाग असतात. त्यामुळे महिला अधिक काळजी घेतात.

महिला कायमच घरी सिल्क साडी धुवत नाहीत. कारण साडी खराब होण्याची शक्यता अधिक असते. लग्न, वास्तूशांती, ऑफिसचा कार्यक्रम किंवा मोठे कार्यक्रम अशावेळी सिल्कची साडी घातली जाते.
सिल्क साड्यांमध्ये लूक जबरदस्त असा दिसतो. बनारसी रेशमी सिल्क साड्या असतात. पण या साड्यांना अगदी व्यवस्थितपणे धुवावे लागते. कारण सिल्क साड्यांना जरीचे वर्क, बारीक डिझाईन केलेले असते.
सिल्क साड्या अनेकदा बाहेर धुण्यासाठी दिल्या की, खराब होण्याची भीती वाटते. याकरिता आपल्या डोळ्यादेखत आणि आपल्या हाताने व्यवस्थित साडी धुवा. विशेष म्हणजे याकरिता फार काही वेळही लागत नाही.
घरच्या घरी साडी धुण्यासाठी एका टबमध्ये पाणी घ्या. गरम पाणी नको नॉर्मल पाणी हवे. यात क्लीनर मिसळा. साडीत त्यात टाकून हळूवार धुवा. अजिबात जोर लावून साडी धुण्याची गरज नाही.
त्यानंतर काही वेळ साडी पाण्याच तशी ठेवा. साडीचे अतिरिक्त पाणी काढून टाका.त्यानंतर स्वच्छ टॉवेलवर ठेवा आणि हळूवार तिचे पाणी निघू द्या. सिल्कची साडी अजिबात पिळू नका.