
बिग बॉस 17 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बॉस 17 धमाका करणार असल्याचे सांगितले जातंय. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडी ही सहभागी होणार असल्याचे स्पष्ट आहे.

बिग बॉस 17 ची पहिली झलक बघायला मिळतंय. यंदा देखील बिग बॉसचे घर अत्यंत खास पद्धतीने डिझाईन करण्यात आलंय. अत्यंत मोठा लिविंग परिसर बघायला मिळतोय.

बिग बॉस 17 च्या कन्फेशन रूमला शैतानी लूक देण्यात आल्याचे दिसतंय. स्विमिंग पूल देखील बिग बाॅसच्या घरात बघायला मिळतोय. स्विमिंग पूलचा परिसर देखील जबरदस्त दिसतोय.

बिग बॉस 17 च्या घराचे व्हायरल होणारे हे फोटो चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसतंय. या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

बिग बॉस 16 ने टीआरपीमध्ये मोठी धमाल केली. यामुळेच आता या सीजनकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ऐश्वर्या शर्मा ही आपल्या पतीसोबत शोमध्ये धमाल करताना दिसेल.