
सलग लागून आलेल्या तीन दिवसाच्या सुट्ट्यांसाठी चाकरमानी मंडळी कुटुंबीय , मित्रपरिवारासह सहली, भटकंतीसाठी बाहेर पडली आहेत. मात्र एवढया मोठ्याया संख्येने पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे एक्सप्रेस वे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

एक्सप्रेस वे वर मुंबई हून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ट्रॅफिक पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरून डायव्हर्ट केली आहे, मात्र वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या या मार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी मात्र वैतागलेले दिसून आले आहे.

या महिन्यातील दुसरा शनिवार, रविवार , व सोमवारी बुद्ध पौर्णिमा असल्याने सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आहेत. मात्र या सुट्ट्यांचा आनंद घेण्यापूर्वी नागरिकांना वाहतूक कोंडीचे दिव्य पार करावे लागत आहे.