AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs PAK Live Streaming : न्यूझीलंड-पाकिस्तान आमनेसामने, सुपर 8 मधील पहिलाच सामना किती वाजता?

New Zealand vs Pakistan Super 8 T20 World Cup 2026 Live Match Score : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने झाले आहेत. आता शनिवारपासून सुपर 8 चा धमाका पाहायला मिळणार आहे.

NZ vs PAK Live Streaming : न्यूझीलंड-पाकिस्तान आमनेसामने, सुपर 8 मधील पहिलाच सामना किती वाजता?
Pakistan vs New Zealand Super 8 Live StreamingImage Credit source: Icc and Blackcaps X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 21, 2026 | 3:11 AM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत शनिवार 21 फेब्रुवारीपासून सुपर 8 फेरीला सुरुवात होत आहे. सुपर 8 फेरीत सर्वोत्तम कामगिरी करणारे 8 पैकी 4 संघ उपांत्य फेरीत पोहचतील. तर 4 संघांचं सुपर 8 मध्येच पॅकअप होईल. त्यामुळे या 8 संघांमध्ये सेमी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत.  सलमान आगा पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर डॅरेल मिचेल याच्याकडे न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. हा सामना कुठे पाहायला मिळणार? तसेच सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना कधी?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवारी 21 फेब्रुवारीला होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येईल?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

पाकिस्तान न्यूझीलंडवर वरचढ, किवी विरुद्ध किती सामने जिंकलेत?

आयसीसी  टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात शनिवारी होणारा हा आठवा सामना असणार आहे. आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या 7 पैकी सर्वाधिक सामन्यात पाकिस्तानचा दबदबा राहिला आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 पैकी 5 सामन्यांत धुव्वा उडवला आहे. तर न्यूझीलंडला 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान न्यूझीलंड विरुद्ध सहावा सामना जिंकून सुपर 8 फेरीत विजयी सलामी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची शेवटच्या 5 टी 20i सामन्यांतील कामगिरी

दरम्यान न्यूझीलंडने गेल्या 5 पैकी 3 टी 20i सामन्यांत विजय मिळवला आहे. तर 2 सामन्यांत न्यूझीलंडला पराभूत व्हावं लागलं आहे. तर पाकिस्तानने त्यांच्या शेवटच्या 5 पैकी 4 टी 20i सामने जिंकले आहेत. तर एकमेव सामना गमवावा लागला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला याच वर्ल्ड कप स्पर्धेत 15 फेब्रुवारीला पराभूत केलं होतं.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा