
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. अर्जुनचा विवाह सारा तेंडुलकर हिची मैत्रीण सानिया चंडोक हिच्याशी झाला. (फोटो क्रेडिट- Instant Bollywood, इन्स्टाग्राम)

या शाही विवाह सोहळ्यात अनेक दिग्गज उपस्थित राहिले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापासून ते क्रिकेट जगतातील अनेक मोठे चेहरे या विवाहाला उपस्थित होते. यावेळी तेंडुलकर परिवार संपूर्ण देशात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. (फोटो क्रेडिट- Instant Bollywood, इन्स्टाग्राम)

लग्न जरी अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचे असले तरी चर्चा मात्र सारा तेंडुलकर हिची होत आहे. सारा तेंडुलकरने या शाही विवाह सोहळ्यात परिधान केलेली साडी सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. या साडीमध्ये सारा तेंडुलकर खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो क्रेडिट- Instant Bollywood, इन्स्टाग्राम)

साराने परिधान केलेल्या साडीचा रंग गुलाबी असा आहे. या साडीसोबत तिने केलेला मेकअप आणि परिधान केलेली आभूषणेदेखील खूपच सुंदर आहेत. तिच्या या लुकची सोशल मीडियावर खूपच चर्चा होत आहे. (फोटो क्रेडिट- Instant Bollywood, इन्स्टाग्राम)

सारा तेंडुलकरचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोंवर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत. तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत आहेत. (फोटो क्रेडिट- Instant Bollywood, इन्स्टाग्राम)