पाय मेहंदीने भरलेले आणि आकर्षक दिसावेत असे वाटत असेल तर या फुलर डिझाइनमधून नक्कीच प्रेरणा घ्या. छोटी फुले, पाने, कर्व्ह्स, स्पायरल आणि शेडिंगचा सुंदर वापर केला आहे. तर घोट्याच्या वरच्या भागात जाळीदार नक्षीसोबत हत्तीचे मोटिफ आणि फ्लोरल डिटेलिंग देण्यात आली आहे.
आता लग्न सराईला सुरुवात झाली आहे. अशात हातावर काढण्यासाठी अनेक मेहेंदीच्या डिझाईन इंटरनेवर देखील असतात. पण पायासाठी कोणती मेहेंदी काढायचा हा मोठा प्रश्न असतो. अशात या काही डिझाइन्स तुम्ही पायावर काढू शकतात, या पाच मेहेंजीच्या डिझाइन्स तुम्हाला देखील आवडतील.

नववधूंसाठी मोराच्या नक्षीचे हे मेहंदी डिझाइन खास ठरेल. मोरासोबतच कमळ, पानांचे मोटिफ, कर्व्ह्स आणि हम्प फ्लॉवरच्या बारीक नक्षीने डिझाइन अधिक आकर्षक बनवले आहे. जाडसर मेहंदीच्या नक्षीमुळे रंग चढल्यानंतर पायांचे सौंदर्य आणखी खुलून दिसेल.
पायांच्या मध्यभागी सुंदर मांडला आणि त्याखाली अँकलेट पॅटर्न तयार करून उर्वरित भागात एकसारख्या नक्षी करत जाळीदार डिझाइन साकारले आहे. हे डिझाइन दिसायला सुंदर असून लावायलाही तुलनेने सोपे आणि कमी वेळखाऊ आहे.
लग्नाच्या दिवशी हटके मेहंदी लावायची असेल तर हे डिझाइन निवडू शकता. संपूर्ण डिझाइन लहान-लहान चौकोनी ब्लॉक्समध्ये विभागले असून त्यात कमळ, फ्रिंज आणि जाळीदार नक्षी अतिशय सुंदर पद्धतीने साकारली आहे. रंग चढल्यानंतरही या डिझाइनला उठावदार लुक मिळेल.
पायांचे सौंदर्य खुलवणारे पण फार बारीक डिटेलिंग नसलेले मेहंदी डिझाइन हवे असेल तर हा उत्तम पर्याय आहे. घोट्याच्या वरच्या बाजूला मांडला आणि छोट्या नक्षी तयार केल्या आहेत. त्यानंतर चेन आणि फ्रिंज पॅटर्नसह पायांच्या पुढील भागात पानांच्या नक्षीची जाळी तयार केली आहे.