
राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार आहे.

शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन असणार.

शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कठोर लॉकडाऊन लागू असेल.

दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी राहणार.

लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्क सेवा सुरू राहणार.

सर्व धार्मिक स्थळ बंद राहणार.

मॉल्स, रेस्टॉरंट आणि बार बंद राहणार.

दुकानात आणि हॉटेल्समध्ये पार्सल सेवा सुरू राहणार.

सर्व मैदान, सभागृह बंद राहणार.

उद्यान, समुद्रकिनारे, सिनेमागृह बंद राहणार.

गृहनिर्माणाची कामं सुरू राहणार.

भाजीपाला मार्केट सुरू राहणार.

रिक्षा, टॅक्सी, खासगी बसेस सुरू राहणार.

मुंबईतील लोकल वाहतुक सुरू राहणार.

प्रवासी वाहतून 50 टक्के क्षमतेनं सुरू राहतील.