IND vs WI : भारताविरुद्ध शेवटच्या तिसऱ्या वनडेत शे होपने बदलला वनडे क्रिकेटचा इतिहास, अनेक रेकॉर्ड मोडले, अशी कामगिरी करणारा पहिला विकेटकिपर-कॅप्टन
Shai Hope Records : वेस्ट इंडिजचा कॅप्टन शे होप भारताविरुद्ध वनडे सीरीजच्या शेवटच्या सामन्यात रेकॉर्ड इनिंग खेळला. त्याने नाबाद 162 धावा करुन वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला.

भारताविरुद्ध वनडे सीरीजच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा कॅप्टन शे होप नाबाद 162 धावांची ऐतिहासिक इनिंग खेळला. त्याने अनेक रेकॉर्ड्स मोडले. होपच्या फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला 352 धावांचं अवघड लक्ष्य पार करता आलं. शे होपने 143 चेंडूत 162 धावा फटकावताना 17 चौकार आणि 3 षटकार लगावले. वेस्ट इंडिजने 5 विकेट राखून हा सामना जिंकला. (PHOTO CREDIT- PTI)
वनडे क्रिकेटच्या 55 वर्षाच्या इतिहासात 150 पेक्षा जास्त धावा फटकावणारा शे होप पहिला विकेटकिपर, कॅप्टन बनला आहे. याआधी विकेटकिपर, कॅप्टन म्हणून सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड एबी डिविलियर्सच्या नावावर होता. डिविलियर्सने वर्ष 2015 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 44 चेंडूत 149 धावा केल्या होत्या. (PHOTO CREDIT- PTI)
भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये टारगेटचा पाठलाग करताना कुठल्याही फलंदाजाने खेळलेली ही सर्वात मोठी इनिंग आहे. होपने श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानचा 17 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला. दिलशानने 2009 साली रन चेज करताना भारताविरुद्ध 160 धावा केल्या होत्या. (PHOTO CREDIT- PTI)
वनडे इतिहासात भारताविरुद्ध कॅप्टन म्हणून 150 पेक्षा जास्त धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या खास क्लबमध्ये शे होपने स्थान मिळवलं आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा कॅप्टन आहे. (PHOTO CREDIT- PTI)
वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासात वनडेत टारगेटचा पाठलाग करताना सर्वात मोठी इनिंग खेळण्याच्या बाबतीत शे होपने दिग्गज क्रिकेटर ख्रिस गेलच्या रेकॉर्डची बरोबरी केली. ख्रिस गेलने 2019 साली इंग्लंड विरुद्ध 162 धावा केल्या होत्या. (PHOTO CREDIT- PTI)