
ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा प्रभाव कमी करण्यासाठी रत्न तसेच वेगवेगळ्या धातूंचा वापर केला जातो. प्रत्येक ग्रहाचे एखादेतरी रत्न असतेच. हे रत्न अंगावर घातल्यास त्याच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती चांगली होते, असे म्हटले जाते.

चंद्र तसेच अन्य ग्रहांच्या सकारात्मक उर्जेला आकर्षित करण्यासाठी चांदीची अंगठी बोटात घालणे प्रभावी ठरू शकते, असे म्हटले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार हाताच्या अंगठ्यात चांदीची अंगठी घातली तर कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. तसेच जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते.

ज्योतिषशास्त्रानुसार चांदीची अंगठी चंद्र तसेच शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्त्व करते. त्यामुळेच चांदीची अंगठी घातल्यास कुंडलीत चंद्रासोबतच शुक्राचीही स्थिती मजूबत होते, असे सांगितले जाते.

चांदीची अंगठी घातल्यानंतर मानसिक शांती मिळते, असे म्हटले जाते. तसेच जीवनात समृद्धीही येते, असे बोलले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी चांदीची अंगठी डाव्या तर पुरुषांनी उजव्या हातात चांदीची अंगठी परिधान करावी.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.