
आपण अनेकदा आपल्या मित्रांना ऑफिसच्या सहकाऱ्यांना कर्ज काढण्यास मदत करतो. प्रसंगी आपण मित्राला कर्ज काढून देताना गॅरंटर होण्यासही तयार होतो. पण एकदा आपण गॅरंटर म्हणून सही केली तर मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.

एकदा गॅरंटर म्हणून सही केली तर कायदेशीररित्या तुमच्या मित्राच्या कर्जाची जबाबदारी तुमच्यावरही येते. तुमच्या मित्राने किंवा अन्य कोणा व्यक्तीने त्या कर्जाची परतफेड न केल्यास बँक ते पैसे तुमच्याकडून वसूल करू शकते.

विशेष म्हणजे बँक तुम्हाला यात कोणतीही सुट देत नाही. ते कर्ज फेडण्याची जबाबदारी तुमचीच असते. भविष्यात बँक नियमाप्रमाणे तुम्हाला नोटीस पाठवू शकते. किंवा प्रसंगीत तुम्हाला जबाबदारही धरू शकते.

तुम्ही गॅरंटर म्हणून एकदा सही केली आणि संबंधित व्यक्तीने ते कर्ज फेडले नाही किंवा कर्जाचा हप्ता फेडण्यास दिरंगाई केली तर त्याच्या तुमच्या सिबिल स्कोअरवर परिणाम पडतो. तुमचा सिबिल घसरतो. भविष्यात तुम्हाला एखादे कर्ज काढायचे असेल तर बँका तुम्हाला कर्ज देण्यासा टाळाटाळ करतात.

विशेष म्हणजे तुम्ही एखाद्या कर्जामध्ये गॅरंटर असाल तर त्या कर्जाची मुद्दल, कर्जाचे व्याज याची तर परतफेड करावी लागतेच. सोबत बँक तुमच्याकडून लेट पेमेंट फी आणि इतरही काही नियमांखाली अतिरिक्त दंड वसूल करू शकते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या कर्जामध्ये गॅरंटर म्हणून सही करताना विचार करायला हवा.