
आपण घरात रोज केर काढतो, लादी पुसतो. जंतू निघून जावेत म्हणून आपण विविध औषधं वापरतो. पण काही जण लादी पुसताना त्या पाण्यात थोडं मीठही घालतात. वास्तूशास्त्रानुसार, दररोज घरात मीठाच्या पाण्याने फरशी पुसणं खूप शुभ मानले जाते. असे केल्याने जीवनात सकारात्मक बदल आणि फायदे होतात. याबद्दल जाणून घेऊया.

वास्तुनुसार, दररोज मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतात. असे मानले जाते की मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे मनःशांती मिळते आणि नातेसंबंध मजबूत होतात. वास्तुनुसार, जमिनीवर मीठ पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. मानसिक ताण कमी होतो आणि जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते.

घरात सकारात्मक वातावरण असेल तर त्याचा घरातील लोकांच्या नातेसंबंधांवरही सकारात्मक परिणाम होतो. वास्तुनुसार, मीठपाण्याने लादी किंवा फरशी पुसल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढतो.

जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा राहिली तर कुटुंबातील सदस्य आजारी पडतात असे म्हटले जाते. तथापि, मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यास, त्या घरात सकारात्मक उर्जेचा संचार वाढतो आणि शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते असेही मानले जाते.

असे मानले जाते की ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते त्या घरात देवी लक्ष्मी रहात नाही. म्हणून, दररोज मिठाच्या पाण्याने पाय लादी पुसल्यास नकारात्मकता कमी होते आणि जीवनात आर्थिक समृद्धी आणि स्थिरता येते.

पण हे नक्की लक्षात ठेवा की प्रार्थना कक्षात किंवा देव्हाऱ्याजवळही मीठ असलेल्या पाण्याने लादी पुसणे, ती स्वच्छ करणे हे शुभ मानले जाते. परंतु हे फरशी पुसलेलं मिठाचं टॉयलेटमध्ये किंवा घराबाहेर फेकून द्यावे. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)