
वेलदोड्याच्या पाण्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नीशियम, पोटॅशियम, झिंक, आयरन, प्रॉटीन आणि फायबर आहे. त्याच्या शरीरास मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

वेलदोड्याचे पाणी बनवण्यासाठी सकाळी दोन वेलदोडे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी उकळून गाळून चहा प्रमाणे घ्या. त्यानंतर तुमच्या अनेक समस्या सुटतील.

वेलदोड्याचे पाणी प्यायल्याने पचन, गॅस, अपचन, सूज येणे या समस्या कमी होतात. जर तुम्हालाही या समस्या असतील तर दररोज या पाण्याचे सेवन करा. चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे या समस्या निर्माण होतात.

वेलदोड्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही वेलदोड्याच्या पाण्याचे सेवन करू शकता.

वेलदोड्याचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते. वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी हे पाणी प्या. कारण जास्त वजन आरोग्यासाठी हानिकारक आहे.

वेलदोडे थंड असतात. यामुळे तुमच्या डोळ्यात जळजळ होत असेल तर हे पाणी फायदेशीर ठरू शकते. वेलदोडे फक्त चवीसाठीच नाही तर अनेक गोष्टीसाठी फायदेशीर आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)