तुमच्या कारमध्येही CNG सिलेंडर आहे? दर तीन वर्षांनी ‘हे’ करा नाही तर होईल नुकसान!

CNG कार चालवताना केवळ गॅस भरणे आणि गाडीची सर्व्हिस करणे पुरेसे नाही. कारमधील CNG सिलेंडर ची नियमित तपासणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सिलिंडरमध्ये सतत वाढणारा आणि कमी होणारा गॅसचा दबाव तसेच ओलाव्यामुळे गंज लागण्याचा धोका असतो.

| Updated on: Nov 14, 2026 | 1:56 PM
1 / 5
 दर तीन वर्षांनी हायड्रो टेस्टिंग आवश्यक: भारतात CNG सिलेंडरची दर तीन वर्षांनी हायड्रो टेस्टिंग करणे बंधनकारक आहे. हा नियम कंपनीकडून बसवलेल्या आणि बाहेरून बसवलेल्या CNG किटसाठी लागू होतो. सिलेंडरच्या मॅन्युफॅक्चरिंग तारखेपासून पुढील टेस्टिंगची तारीख निश्चित केली जाते. अपघात, आग, गंज किंवा सिलेंडरवर डेंट दिसल्यास मुदतीपूर्वीही तपासणी करावी.

दर तीन वर्षांनी हायड्रो टेस्टिंग आवश्यक: भारतात CNG सिलेंडरची दर तीन वर्षांनी हायड्रो टेस्टिंग करणे बंधनकारक आहे. हा नियम कंपनीकडून बसवलेल्या आणि बाहेरून बसवलेल्या CNG किटसाठी लागू होतो. सिलेंडरच्या मॅन्युफॅक्चरिंग तारखेपासून पुढील टेस्टिंगची तारीख निश्चित केली जाते. अपघात, आग, गंज किंवा सिलेंडरवर डेंट दिसल्यास मुदतीपूर्वीही तपासणी करावी.

2 / 5

CNG सिलेंडरची वैधता किती असते?: हायड्रो टेस्टिंगमध्ये सिलेंडर पास झाल्यास तो पुढील तीन वर्षांसाठी वापरता येतो. मात्र, सिलेंडरची एकूण सर्व्हिस लाइफ वेगळी असते. उत्पादक आणि लागू नियमांनुसार CNG सिलेंडरची कमाल मुदत उत्पादनाच्या तारखेपासून 20 वर्षांपर्यंत असू शकते. टेस्ट पास झाल्याने सिलेंडरची एकूण वयोमर्यादा वाढत नाही.

3 / 5

टेस्टिंगसाठी किती खर्च येतो?: CNG सिलेंडरच्या हायड्रो टेस्टिंगचा खर्च सिलेंडरची संख्या आणि टेस्टिंग सेंटरनुसार बदलतो. ट्विन सिलेंडर असलेल्या कारमध्ये दोन्ही सिलिंडरची तपासणी करावी लागते, त्यामुळे खर्च अधिक होऊ शकतो. सिलेंडरचा व्हॉल्व्ह खराब असल्यास तो बदलण्याचा खर्च वेगळा असतो. टेस्टमध्ये सिलेंडर फेल झाल्यास नवीन सिलेंडर बसवण्यासाठी साधारण 12,000 ते 18,000 रुपये खर्च येऊ शकतो. फिटिंगचे शुल्क वेगळे असते.

4 / 5

हायड्रो टेस्टिंगची प्रक्रिया कशी असते?: अधिकृत टेस्टिंग सेंटरमध्ये सर्वप्रथम सिलेंडरमधील उरलेला गॅस सुरक्षितपणे काढला जातो आणि सिलेंडर कारमधून वेगळा केला जातो. त्यानंतर गंज, तडे आणि डेंट तपासले जातात. पुढे सिलेंडरमध्ये पाणी भरून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त दाब देऊन त्याची क्षमता तपासली जाते. गळती किंवा कायमस्वरूपी फुगवटा आढळतो का, हे पाहिले जाते. टेस्ट पास झाल्यानंतर सिलेंडरवर पुढील तपासणीची तारीख नोंदवली जाते.

5 / 5

टेस्टिंग न केल्यास काय होऊ शकते?: हायड्रो टेस्टिंगची मुदत संपल्यास CNG पंपावर गॅस भरण्यास नकार दिला जाऊ शकतो. वाहनाच्या कागदपत्रांच्या तपासणीवेळीही अडचणी येऊ शकतात. अपघात झाल्यास विमा क्लेमच्या वेळी प्रश्न उपस्थित होऊ शकतात. मात्र, क्लेमचा निर्णय विमा पॉलिसी आणि अपघाताच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. सिलेंडर टेस्टमध्ये फेल झाल्यास त्याचा पुन्हा वापर करता येत नाही. त्याऐवजी नवीन मान्यताप्राप्त सिलेंडर बसवावा लागतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us