
आजकाल अनेकजण कॅमोमाईल या हर्बल ड्रिंगची सगळीकडे चर्चा होत आहे. मॅट्रिकरारिया कॅमोमिला या झाडाच्या सुकलेल्या फुलांपासून कॅमोमाईल टी तयार केला जातो. या चहामध्ये अँटिऑक्सिटंड आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात असे सांगितले जाते.

या चहामध्ये एपिजिनिन नावाचे अँटिऑक्सिडंट असते. त्यामुळे लवकर झोप येते आणि अनिद्रेचा त्रास कमी होतो, असे सांगितले जाते. याच पार्श्वभूमीवर कॅमोमाील टी पिल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊ या...

या चहामुळे आपली चेतासंस्था म्हणजेच नर्व्हस सस्टिम चांगली राहते असे सांगितले जाते. कामाच्या दवाबामुळे तुम्ही मानसिक तणावाखाली जगत असाल तर तुम्ही कॅमोमाईल टी प्यायला हवा, असा सल्ला दिला जातो. या चहामुळे शांती लाभते. तसेच इंझायटी कमी होते.

या चहामुळे पचनसंस्था सुधारते. तसेच पोटाची समस्याही दूर होते, असे सांगितले जाते. हा चहा नियमितपणे घेतला तर तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियमंत्रित राहते असे सांगितले जाते.

(टीप- या लेखातील स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा. त्यानंतरच कोणताही प्रयोग करावा.)