
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. तिच्या सौंदर्याचे लाखो तरुण दिवाने आहेत.

सारा तेंडुलकर आपल्या शरीराची फारच काळजी घेते. तिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती दिवसभरात नेमकं काय करते, याबाबत सांगितलं आहे.

सारा तेंडुलकर सकाळी आठ वाजता उठून कॉपी घेते. त्यानंतर 9 वाजता पिलाटे व्यायाम करायला बाहेर पडते. या व्यायामामुले पोट, हिप्स, लोअर बॅकच्या पेशीं मजबूत होतात.

त्यानंतर सकाळी 10 वाजता ती गाडीतच हलकासा मेकअप करते. त्यानंतर साडे दहा वाजता कामासंदर्भात ती वेगवेगळ्या मिटिंग्स घेते.

दुपारी एक वाजती ती सध्या पॉटरी क्लासला जात आहे. या क्लासमध्ये मातीची भांडी कशी तयार करायची, हे शिकवलं जातं.

त्यानंतर ती दुपारी दोन वाजता दुपारचं जेवण करते. दिवसभराची उरलेली कामे करून ती रात्री अकरा वाजता झोपी जाते.

सारा तेंडुलकर