
सध्याचं जग हे सोशल मीडियाचं आहे. आज तुम्हाला प्रत्येकजण फेसबुक, इन्स्टाग्रामवर रमलेला दिसतो. दहापैकी आठ जण तुम्हाला रिल्स पाहताना दिसतात. विशेष म्हणजे आजकालची जेन झी तर तुम्हाला सतत फोनमधील सोशल मीडियावर चॅटिंग करताना दिसते. जेन झीमधील मुलं तर चॅटिंग करताना शॉर्ट फॉर्म्सचा वापर करताना दिसतात.

अनेकदा एखादी व्यक्ती तुम्हाला फक्त काही अक्षरं पाठवते. तुम्हाला शॉर्टमध्ये एखादा मेसेज देते, पण तुम्हाला ते समजतच नाही. तुमची ऐनवेळी फजिती होते. हीच फजिती उडू नये यासाठी चॅटिंग करताना काही शॉर्ट फॉर्म माहिती असणे गरेजेचे आहे. हे महत्त्वाचे शॉर्ट फॉर्म कोणते आहेत, ते जाणून घेऊ या...

चॅटिंग करताना अनेकजण TBH हा शॉर्ट फॉर्म वापरून मेसेज करतात. TBH चा अर्थ टू बी हॉनेस्ट असा होतो. म्हणजेच मी प्राणाणिकपणे सांगतोय, असे समोरच्या व्यक्तीला म्हणायचे असते. BRB या शॉर्ट फॉर्मचा अर्थ बी राईट बॅक म्हणजे मी नुकतेच परत आलो असा होतो. CTN या फुल फॉर्मचा अर्थ कान्ट टॉक नाऊ म्हणजेच मी सध्या तुझ्याशी बोलू शकत नाही असा होतो.

HTH या शॉर्ट फॉर्मचा अर्थ होप धिस हेल्प्स म्हणजेच आशा करतो की तुला यामुळे मदत होईल असा आहे. IYKYK हा शॉर्ट फॉर्म तर अनेकदा वापरला जातो. अनेकांना याचा अर्थ माहिती नाही. या शॉर्ट फॉर्मचा अर्थ ईफ यू नो यू नो असा होतो. एखादा विषय सविस्तरपणे न सांगता संकेतांनी, जुन्या संदर्भांनी सांगितला जातो तेव्हा या शॉर्ट फॉर्मच वापर होतो.

GOAT या शॉर्ट फॉर्मचाही वापर तुम्ही अनेक ठिकाणी पाहिला, वाचला असाल. याचा अर्थ ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम असा आहे. एखाद्या व्यक्तीचे गुणगाण करायचे असेल, संबंधित गोष्ट सर्वश्रेष्ठ आहे असे सांगायचे असेल तर या शॉर्ट फॉर्मचा वापर होतो. IDK या शॉर्ट फॉर्मचा अर्थ आय डोन्ट नो म्हणजेच मला माहिती नाही, असा होतो.