OK शब्दाचा नेमका अर्थ काय? 99 टक्के लोकांना माहितीच नाही; वाचून व्हाल चकित!
इंग्रजी भाषेतले असे अनेक शब्द आहेत, ज्यांचा अर्थ माहिती नसला तरीही आपण तो वापरतो. त्यामुळे अनेकदा चांगलीच पंचाईत होते. आपण इंग्रजी भाषेतील एक शब्द तर अगदीच सर्रास वापरतो. हा शब्द आहे OK.

आपली मातृभाषा मराठी असली तरीही आपण आपल्या संभाषणात इंग्रजी शब्दांचा वापर खूप करतो. जवळजवळ प्रत्येक वाक्यात आपण एक तरी इंग्रजी शब्द वापरतोच. पण आपण असे काही शब्द वापरतो, ज्यांचा खरा अर्थच आपल्याला माहितीन नसतो.

इंग्रजी भाषेतले असे अनेक शब्द आहेत, ज्यांचा अर्थ माहिती नसला तरीही आपण तो वापरतो. त्यामुळे अनेकदा चांगलीच पंचाईत होते. आपण इंग्रजी भाषेतील एक शब्द तर अगदीच सर्रास वापरतो. हा शब्द आहे OK.

इंग्रजीतील OK या शब्द तसा फारसा अवघड नाही. अगदी दोन अक्षरांचा हा शब्द असल्याने तो पाठ करण्याचीही गरज नाही. आजकाल मेसेंजर, व्हॉट्सअॅप आदी मेसेजिंग अॅपवर तर हा शब्द आपण दिवासातून अनेकदा वापरतो.

आता या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, ते जाणून घेऊ या. अनेकजन OK या शब्दाचा अर्थ हा Oll Korrect असा आहे, असे म्हणतात. अनेकजण हा शब्द All Correct यासाठी वापरतात, असा दावा करतात.

अनेकजण OK हा शब्द चुकीचा असून तो खरा शब्द Okay असा आहे, असा दावा करतात. Ok या शब्दाबाबत अनेकजण वेगवेगळा दावा करतात. परंतु हा शब्द उच्चारताच सर्वकाही आलबेल आहे, अशी येणारी भावना मात्र सर्वमान्य आहे.