
पॉलिग्राफ चाचणी म्हणजे थोडक्यात एखादी व्यक्ती जे काही सांगत आहे ते खरे आहे की खोटे हे या चाचणीवरून लक्षात येतं. आरोपी संजय राय याची चाचणी करण्यासाठी सीबीआय न्यायालयाने परवानगी दिली आहे.

पॉलिग्राफ चाचणी जास्त करून आरोपींची केली जाते, गुन्हा उलगडण्यासाठी आरोपी खोटे बोलत आहेत की खरे हे यावरून लक्षात येते.

आरोपीला जेव्हा प्रश्न विचारला जातो की, तो खोटे बोलला तर त्याच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासात बदल होतो आणि त्याला घाम येऊ लागतो. यासाठी व्यक्तीच्या शरीरात कार्डिओ-कफ आणि संवेदनशील उपकरणे बसवली जातात जी स्क्रीनवर त्याची प्रत्येक क्रिया दर्शवतात. यानुसार आरोपी खरे बोलत आहे की खोटे ठरवलं जातं, हे तपासामध्ये खूप जास्त उपयोगी ठरतं.

कोलकाता बलात्कार प्रकरणात एकापेक्षा जास्त जणांचा यात सहभाग असल्याचा संशय असल्याने आरोपीची ही चाचणी घेण्याची गरज होती.

या चाचणीद्वारे सीबीआय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की आरोपी जे सांगत आहे ते खरे आहे का किंवा त्याने कुणाला वाचवण्यासाठी गुन्ह्याची कबुली दिली आहे का? आता सर्व प्रकरण समोर येईल.