Anil Kapoor : वय 69 तरी अनिल कपूर एवढा फिट कसा, खुद्द त्यानेच सांगितलं सिक्रेट!
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अनिल कपूर स्ट्रेंथ ट्रेनिंग, सायकलिंग, रनिंगही करतो. व्यायामासोबतच मनामध्ये सकारात्मकता असणंही तेवढंच गरजेचं आहे, असं अनिल कपूर सांगतो.

बॉलिवुडमधील दिग्गज अभिनेता अनिल कपूर नेहमीच चर्चेत असतो. अभिनयाच्या जोरावर अनिल कपूरने सिनेक्षेत्रात आपले वेगळे वर्चस्व निर्माण केले आहे. हाच अनिल कपूर आपल्या फिटनेसमुळेही नेहमीच चर्चेत असतो.
अनिल कपूर 69 वर्षांचा आहे. तरीदेखील तो एखाद्या तरुणासारखाच दिसतो. त्याच्या तारुण्याचे राज खुद्द त्यानेच सांगितले आहे. येत्या अनिल कपूरची 2020 सालची एक मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्याने आपल्या फिटनेचे सिक्रेट सांगितले आहे.
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अनिल कपूर स्ट्रेंथ ट्रेनिंग, सायकलिंग, रनिंगही करतो. व्यायामासोबतच मनामध्ये सकारात्मकता असणंही तेवढंच गरजेचं आहे, असं अनिल कपूर सांगतो.
तो मनात कायम सकारात्मक भावना ठेवतो. नेहमी आनंदी राहण्याचा त्याचा प्रयत्न असतो. हेल्थी आयुष्यासाठी तुम्ही चांगले अन्न खाणेही तेवढेच गरजेचे आहे, असे अनिल कपूर सांगतो.
तुम्ही जेवत असलेल्या जेवणातूनच 70 ते 80 टक्के आजार होतात. त्यामुळे पौष्टिक अन्न खाणे खूप गरजेचे आहे. शरीराला सतत सक्रिय ठेवायला हवे. त्यासाठी व्यायामही करू शकता. शरीराला गरजेचे असणारे हेल्दी फूड खाणेही गरजेचे आहे, असे अनिल कपूर सांगतो.