
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्या नात्याची नेहमीच मीडियामध्ये चर्चा होते. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यावेळी 32 वर्षाच्या हेमा मालिनी यांनी 45 वर्षाच्या धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केलं.

त्या काळात दोघांच्या लग्नावरुन बराच वाद झाला होता. धर्मेंद्र यांच्या या निर्णयावरुन त्यांच्या घरी बरीच वादावादी झालेली. कारण धर्मेंद्र यांनी पहिली पत्नी आणि चार मुलं असताना हे पाऊल उचललं होतं.

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरप्रमाणे त्यांची दोन्ही मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांना सुद्धा झटका बसलेला.

धर्मेंद्र यांचे कुटुंबियांसोबत संबंध ताणले गेले. पण नंतर सगळं काही सामान्य झालं. सनी आणि बॉबी सोबत हेमा मालिनी यांचे आता चांगले संबंध आहेत. हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यावयात फार अंतर नाहीय.

सनी आपल्या सावत्र आईपेक्षा फक्त 9 वर्षांनी लहान आहेत. हेमा मालिनी आणि बॉबी देओल यांच्यावयात 21 वर्षांचं अंतर आहे. एकदा बोलताना एका व्यक्तीने हेमा मालिनी यांना प्रश्न विचारलेला सनी देओल आणि बॉबी देओल तु्म्हाला काय म्हणून हाक मारतात. त्यावर अभिनेत्रीने 'हेमा जी' असं उत्तर दिलेलं.