
लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. हा महिना भगवान महादेवाचा आवडता महिना आहे. त्यामुळे या महिन्यात महादेवाची पूजा केली जाते.

महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण पूजा करतात, उपवास ठेवतात. मात्र याच श्रावण महिन्यात काही चुका केल्याने भगवान महादेव नाराज होऊ शकतात. त्यामुळे श्रावण महिन्यात या पाच चुका चुकूनही करू नये. सर्वांत पहिली बाब म्हणजे श्रावण महिन्यात तामसिक भोजन करू नये.

म्हणजेच श्रावणात मांस, मद्य खाऊ नये. तसेच भोजात कांदा, लसून यांनाही टाळावे, असे सांगितले जाते. श्रावण महिना हा सात्विकता आणि सुद्धेचे प्रतिक आहे. त्यामुळे तामसिक भोजन करू नये.

श्रावण महिन्यात काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत. श्रावणात पांढऱ्या रंगाचे कपडे शूभ मानले जातात. काळ्या रंगाला नकारात्मकतेशी जोडले जाते. त्यामुळेच या महिन्यात काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत, असे सांगितले जाते.

या महिन्यात शिवलिंगावर दूध चढवणे हे पुण्याचे मानले जाते. त्यामुळे या महिन्यात दूधाचे सेवन करू नये. श्रावणात दूधाचे सेवन केल्यास गर्मी, त्वाचेशी संबंधित त्रास होऊ शकतो, असे सांगितले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.