सुकलेली तुळस फेकून देण्याची चूक करू नका, आजच करा एक उपाय

तुमच्या घरातील तुळशीचे रोप सुकले आहे का? सुकलेली तुळस फेकून देणे अशुभ मानले जाते. या लेखात जाणून घ्या वाळलेल्या तुळशीचा वापर हवन, दिवा आणि खतासाठी कसा करावा आणि त्यापासून नवीन रोप कसे मिळवावे?

| Updated on: Jan 25, 2026 | 4:02 PM
1 / 6
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. धार्मिक महत्त्वासोबतच औषधी गुणांमुळे तुळशीला प्रचंड महत्त्व असते. मात्र, अनेकदा योग्य काळजी घेऊनही तुळशीचे रोप सुकते. अशा वेळी अनेक जण सुकलेले रोप फेकून देतात.

2 / 6
परंतु धार्मिक शास्त्रानुसार वाळलेली तुळस फेकून देणे अशुभ मानले जाते. जर तुमच्या घरातील तुळस सुकली असेल, तर ती फेकून देण्याऐवजी तुम्ही खालील पद्धतीने तिचा पुनर्वापर करू शकता.

3 / 6
वाळलेल्या तुळशीच्या लाकडाचा वापर हवनामध्ये करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीचे लाकूड जाळल्याने निघणारा सुगंध घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतो. तसेच, यातील अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे वातावरणातील जंतू नष्ट होण्यास मदत होते. तुम्ही हे लाकूड चंदनाप्रमाणे घासून त्याचा टिळा देखील लावू शकता.

4 / 6
वाळलेल्या तुळशीच्या लहान फांद्या एकत्र करून त्यांना कापूस गुंडाळून किंवा तुपात भिजवून त्यांचा दिवा लावता येतो. असे मानले जाते की, तुळशीच्या काष्ठाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन समृद्धी येते.

5 / 6
सुकलेल्या तुळशीची पाने आणि फांद्या फेकून न देता त्यांचा खत म्हणून वापर करा. वाळलेली पाने हाताने कुस्करून त्याची पावडर करा आणि ती कुंडीतील मातीत मिसळा. यामुळे मातीचा पोत सुधारतो आणि इतर झाडांची वाढ जोमाने होते.

6 / 6
वाळलेल्या तुळशीवर असलेल्या मंजिरी (बिया) गोळा करा. या बिया पुन्हा कुंडीत पेरल्यास त्यातून नवीन आणि निरोगी तुळशीचे रोप तयार होऊ शकते. जुन्या रोपाचे विसर्जन करण्यापूर्वी त्याच्या बिया जतन करणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे.