उन्हाळा की पावसाळा? प्राजक्ता माळीच्या रिसॉर्टला कधी भेट देणं फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या कर्जतमधील रिसॉर्टचे नेहमी फोटो शेअर करत असते. पण तिच्या रिसॉर्टला उन्हाळ्यात की पावसाळ्यात भेट देणं फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: May 14, 2026 | 5:32 PM
1 / 5
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही अभिनयाबरोबरच तिच्या वेगळ्या लाइफस्टाइलमुळेही कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेली प्राजक्ता अनेकदा निसर्गरम्य ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

2 / 5
विशेष म्हणजे कर्जत परिसरातील तिच्या रिसॉर्टची देखील चाहत्यांमध्ये मोठी चर्चा असते. मुंबईपासून जवळ असलेला कर्जत परिसर हिरवाई, डोंगररांगा आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक पर्यटक विकेंड ट्रिपसाठी या भागाला पसंती देतात.

3 / 5
मात्र, प्राजक्ता माळीच्या कर्जतमधील रिसॉर्टला भेट देण्यासाठी नेमका कोणता ऋतू सर्वोत्तम ठरतो? उन्हाळा की पावसाळा? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.  पावसाळ्यात हा परिसर अक्षरशः स्वर्गासारखा दिसू लागतो. डोंगरांवरून वाहणारे धबधबे, धुक्याने झाकलेले रस्ते आणि सर्वत्र पसरलेली हिरवाई पर्यटकांना भुरळ घालते.

4 / 5
प्राजक्ता माळीच्या रिसॉर्टला पावसाळ्यात भेट दिल्यास शांत वातावरणासोबत निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. शहरातील गोंगाटापासून दूर काही क्षण निवांत घालवण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो. कपल्स, फॅमिली ट्रिप आणि फ्रेंड्स ग्रुपसाठी पावसाळा अधिक आकर्षक ठरतो.

5 / 5
तर उन्हाळ्यात कर्जतचा परिसर तुलनेने कोरडा असला तरी रिसॉर्टमध्ये आरामदायी सुट्टी घालवण्यासाठी हा काळही चांगला मानला जातो. स्विमिंग पूल, इनडोअर गेम्स आणि रिलॅक्सेशनचा आनंद घेणाऱ्यांसाठी उन्हाळा योग्य ठरतो. वीकेंडला गर्दी कमी असल्यामुळे शांत वातावरण अनुभवता येतं. अनेक जण शहरातील धावपळीपासून दूर जाऊन आराम करण्यासाठी या काळात रिसॉर्टला भेट देतात.

Follow Us