
प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्नाच्या एका कृतीने मुलांना लाज आणली. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना बॉलिवूडमधली लोकप्रिय जोडी आहे. दोघे अनेकदा परस्पराचे फोटो शेयर करत असतात.

अक्षय कुमार आपल्या कामासोबत मुलांना सुद्धा वेळ देतो. ट्विंकल खन्ना सुद्धा मुलांना वेळ देते. ट्विंकल खन्नाने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम हँडलवर एक फॅमिली व्हिडिओ शेअर केलाय.

अक्षय आणि ट्विंकल आपल्या दोन मुलांसोबत दिसतायत. क्लिप पाहून हा त्यांच्या वेकेशनचा व्हिडिओ दिसतोय. अक्षय आणि ट्विंकल दोघेही कंबरेला लचके देत चालतायत. या कृतीने सोबत असलेल्या मुलांना लाज आणलीय.

जेव्हा तुम्ही डान्स करु शकता, तेव्हा पायी का चालायच? मुलांना लाजवण्याची संधी असं ट्विंकल खन्नाने म्हटलय.

पुढे ती पोस्टमध्ये म्हणते, जेव्हा मुलं किशोरवयात येतात, तेव्हा तुमच्या असण्यामुळेच त्यांना लाज वाटते.