जगात सर्वाधिक सोन्याचे उत्पादन कोणत्या देशात होते? भारताचा क्रमांक कितवा?

भारतीय लोकांना सोन्याचे आकर्षण असते. त्यामुळे जगभरात सोन्याची सर्वाधिक विक्री भारतात होते. प्रत्येक भारतीयांच्या घरात सोने आहे. भारतात लग्नापासून अनेक धार्मिक कार्यासाठीही सोने वापरले जाते. यामुळे भारताची संस्कृती आणि परंपरेचा सोने एक भाग बनले आहे. कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक सोने निघते, त्याची माहिती तुम्हाला आहे का?

| Updated on: Jun 28, 2025 | 1:34 PM
1 / 5
जगातील अनेक देशांमध्ये सोन्याच्या खाणी आहेत. अनेकांना वाटते सौदी देशांमध्ये सोने स्वस्त आहे. त्यामुळे त्या देशांमध्ये सोन्याचे उत्पादन सर्वाधिक असणार आहे. परंतु तसे नाही. भारताच्या शेजारील देशात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन होते.

2 / 5
जगातील सर्वाधिक सोन्याचे उत्पादन चीनमध्ये होते. चीनमध्ये सोन्याच्या अनेक खाणी आहेत. त्यातून अनेक टन सोने काढले जाते. एका रिपोर्टनुसार, सन २०२४ मध्ये चीनमध्ये सोन्याचे ३८० टन उत्पादन करण्यात आले.

3 / 5
सोन्याच्या उत्पादनात चीननंतर रशिया आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या रिपोर्टनुसार २०२४ मध्ये रशियात २८४ टन सोन्याचे उत्पादन झाले. ऑस्ट्रेलियात २०२ टन सोन्याचे उत्पादन झाले.

4 / 5
जगात सर्वाधिक सोन्याचे उत्पादन करणाऱ्या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर कॅनडा आहे. त्यानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे नाव येते.

5 / 5
सोन्याची सर्वाधिक विक्री होत असूनही भारतातील सोन्याचे उत्पादन खूप कमी आहे. जगातील पहिल्या दहा देशांमध्येही भारताचे नाव नाही. अगदी जगातील टॉप ५० देशांमध्येही भारत नाही. भारतात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन कर्नाटक राज्यामध्ये होते.

Follow Us