
मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी पालक प्रयत्न करत असतात. वास्तुशास्त्रात यासाठी काही नियम सांगितले आहे. मुलांनी कोणत्या बाजूला तोंड करून अभ्यास करावा याबाबत सांगितलं आहे. चला वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं ते जाणून घेऊयात

वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन केलं तर घरात सकारात्मक वातावरण राहतं. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वास्तुशास्त्रात काही नियम आणि दिशा सांगितली गेली आहे.

मुलांच्या अभ्यासाची खोली कायम घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी. मुलांचा अभ्यास करताना तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं.

पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास करणं उत्तम मानलं गेलं आहे. यासाठी मुलांना या दिशेकडे पाहून अभ्यास करण्याचा सला दिला जातो.

मुलं अभ्यास करतात ती खोली कायम व्यवस्थित असावी. सामान अस्तव्यस्त पडलं असेल तर अभ्यासात मन रमत नाही. तसेच सकारात्मक ऊर्जा राहत नाही.

मुलांच्या खोलीला कायम हलक्या रंगाचा पेंट करावा. यामुळे मुलांचं मन शांत राहतं. तसेच त्यांचं लक्ष केंद्रीत राहतं. (सर्व फोटो- टीव्ही 9 हिंदी) ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)