500 पेक्षा जास्त कामे करणारा शरीरातील महत्त्वाचा अवयव कोणता? दुर्लक्ष केलात तर पडेल महागात

आपल्या शरीरात असा एक अवयव आहे जो न थकता ५०० हून अधिक कामे करतो. हा अवयव कोणता आणि तो निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या सवयी आवश्यक आहेत, याची रंजक माहिती येथे वाचा.

| Updated on: Feb 17, 2026 | 4:07 PM
1 / 6
आपल्या शरीराचे इंजिन सुरळीत चालण्यासाठी अनेक अवयव रात्रंदिवस काम करत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या शरीरात एक असा अवयव असतो, जो सर्वात जास्त काम करत असतो.

2 / 6
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, यकृत (Liver) हा आपल्या शरीरातील असाच एक महत्त्वाचा अवयव आहे जो ५०० हून अधिक काम करत असतो. यकृत केवळ अन्न पचवण्याचेच काम करत नाही, तर रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यापासून ते ऊर्जेचा साठा करण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.

3 / 6
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यकृत खराब होऊ लागल्यावर सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत, म्हणूनच याला सायलेंट किलर असेही म्हटले जाते. यकृताला निरोगी ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल करणे अनिवार्य आहे.

4 / 6
यकृत हे निरोगी ठेवण्यासाठी ताज्या भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्याचा आहारात समावेश करा. साखर आणि प्रक्रिया केलेले जंक फूड यकृतावर भार वाढवतात, त्यामुळे ते टाळावे. वाढते वजन यकृताभोवती चरबी जमा होते. त्यामुळे दररोज ३० मिनिटे चालणे किंवा योगा केल्याने यकृताचे कार्य सुधारते.

5 / 6
मानसिक ताण हार्मोनल संतुलन बिघडवतो, ज्याचा थेट परिणाम यकृतावर होतो. यासाठी ध्यान आणि श्वसनाचे व्यायाम फायदेशीर ठरतात. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी भरपूर पाणी प्या. सोडा आणि साखरयुक्त शीतपेयांपासून दूर राहणेच हिताचे आहे.

6 / 6
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)