
डी-मार्टमध्ये स्वस्त आणि अनेक गोष्टी एकाच जागेवर मिळत असल्यामुळे अनेक ग्राहक हे डी-मार्टमध्ये खरेदी करण्यास पंसती देतात. त्यामुळे डीमार्ट ही सर्वसामान्य ग्राहकांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे.

डी-मार्टमध्ये आठवड्याभरात अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते. यामध्ये एकावर एक फ्री असेल किंवा 50 टक्के डिस्काउंट. अशा अनेक ऑफर तिथे मिळत असतात.

पण अनेकांना हे माहिती नाही की जर डी-मार्टमध्ये खरेदी करून जास्त बचत करायची असेल तर कोणत्या दिवशी गेलं पाहिजे. आज आम्ही तुम्हाला कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये जास्त सवलत असते याबद्दल सांगणार आहोत.

डीमार्टमध्ये शनिवार आणि रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी लोकांची गर्दी असते. या दिवशी काही निवडक वस्तूवर सवलत देखील दिली जाते.

यामध्ये शनिवारी ही अनेक गोष्टी बाय 1 गेट 1 आणि 50 टक्के डिस्काउंटसह मिळतात. तर रविवारी जे स्टॉक शिल्ल्क आहेत त्यावर 10-20 टक्के सूट मिळते. ज्यामध्ये भाज्या, दूध, पावडर अशा गोष्टींचा समावेश आहे.

तर सोमवार ते बुधवार या दिवशी ऑनलाइन App वर खरेदी केल्यास त्यामध्ये कूपन्सचा वेगवेगळ्या ऑफरचा तुम्ही फायदा घेऊ शकता. ज्यामध्ये तुम्हाला घरपोच सामान मिळते.