इतिहासातील सर्वाधिक विकला गेलेला मोबाईल कोणता? नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

आजच्या काळात iPhone आणि महागड्या Android स्मार्टफोनची क्रेझ असली, तरी जगातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या मोबाईलचा मान एका साध्या फोनला मिळाला आहे. विशेष म्हणजे, या फोनमध्ये आजच्या स्मार्टफोनसारखे आधुनिक फीचर्सही नव्हते. जाणून घेऊया या ऐतिहासिक मोबाईलबद्दलच्या 5 खास गोष्टी.

| Updated on: Nov 19, 2026 | 3:18 PM
1 / 5
जगातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या मोबाईल फोनचा मान नोकिया 1100 (Nokia 1100) याला मिळाला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, या फोनच्या 25 कोटींहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.

जगातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या मोबाईल फोनचा मान नोकिया 1100 (Nokia 1100) याला मिळाला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, या फोनच्या 25 कोटींहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.

2 / 5

नोकिया 1100 हा मोबाईल 2003 मध्ये बाजारात दाखल झाला. त्या काळात मोबाईल फोन सामान्य लोकांपर्यंत पोहोचत होते. हीच संधी ओळखून नोकियाने हा फोन बाजारात आणला होता.

3 / 5

या फोनमध्ये स्मार्टफोनसारखे आधुनिक फीचर्स नव्हते. मात्र, मजबूत बॉडी, सोपा वापर, लांब टिकणारी बॅटरी आणि परवडणारी किंमत यामुळे तो प्रचंड लोकप्रिय झाला.

4 / 5

नोकिया 1100 ला भारतासह अनेक विकसनशील देशांमध्ये मोठी पसंती मिळाली. पहिल्यांदा मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा फोन एक उत्तम पर्याय ठरला होता.

5 / 5

नोकियाचा आणखी एक लोकप्रिय फोन म्हणजे नोकिया 1110. या फोनचीही सुमारे 25 कोटी युनिट्स विकल्याचे विविध स्रोत सांगतात. मात्र, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोकिया 1100 ला सर्वाधिक विकल्या गेलेल्या मोबाईलचा विक्रम दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us