
गेल्या अनेक दिवसांपासून आठवड्यातील सर्वात आळशी आणि खराब दिवस कोणता याबद्दल जोरदार चर्चा आणि मतभेद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. याबद्दल सध्या अनेक मीम्स आणि फोटोही व्हायरल होताना दिसत आहे.

आता अखेर या वादावर आता पडदा पडला आहे. जगातील विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने (Guinness World Records) अखेर याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे.

यावेळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आठवड्यातील सर्वात वाईट, कंटाळवाणा किंवा आळशी दिवस कोणता, याबद्दलची माहिती जाहीर केली आहे. त्यांनी त्यांच्या अकाऊंटवरुन याबद्दलची पोस्ट करताच ती खूप व्हायरल झाली आहे.

ही पोस्ट व्हायरल होताच कोट्यवधी लोकांनी या निर्णयाला समर्थन दिले. कारण अनेक काम करणाऱ्या लोकांच्या भावना या निर्णयाशी जुळणाऱ्या होत्या. गिनीज विश्वविक्रमांनी जाहीर केलेला आठवड्यातील सर्वात वाईट, कंटाळवाणा आणि आळशी वाटणारा दिवस हा सोमवार असल्याचे म्हटले आहे.

सोमवार हा दिवस कंटाळवाणा असल्यामागे अनेक कारणंही समोर आली आहेत. कारण हा दिवस थेट आठवड्याच्या शेवटी मिळालेल्या आरामानंतर येतो. त्यामुळे आपले मन सुट्टीच्या रिलॅक्स मोडमध्ये असते.

तसेच आपले मन कामाचा ताण लगेच स्वीकारण्यास तयार नसते. आठवड्याची सुरुवात असल्याने अनेकदा मागील आठवड्यातील राहिलेले काम किंवा नवीन कामांचे नियोजन याच दिवशी करावे लागते.

यामुळे कामाचा मोठा डोंगर समोर उभा राहतो. त्यामुळे शरीरात काम करण्याची ऊर्जा कमी वाटते. तसेच उत्साह लगेच परत येत नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने ही अधिकृत घोषणा करण्यात आल्याने इंटरनेटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला.

गिनीज बूकने टाकलेली ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली. त्यांच्या या पोस्टला कोट्यवधी लोकांनी या निर्णयाला समर्थन दिले. कारण अनेक काम करणाऱ्या लोकांची मते याच्याशी संबंधित होती.